'भाजप 'अच्छे दिन'च्या आशेवर दोन वर्षांपासून देशातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांची रोज फसवणूक करीत आहे.' अशी जोरदार टीका त्यांनी केली. 'मागील दोन वर्षात भाजप सरकारनं केलेलं एक तरी विधायक काम सांगाव आणि आमच्याकडून एक लाख रुपये घेऊन जावे.' असं आव्हानही त्यांनी दिले.
शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणी विचारत नाही आणि हे दुसऱ्या राज्यात निवडणुका लढवायला निघाले आहेत असं म्हणत नारायण राणेंनी गोव्यातील निवडणुकीवरुन शिवसेनेचीही खिल्ली उडवली.