पुणे: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी, ता २)  रोजी मतदान प्रकिया पार पडत आहे, त्यासाठी राज्यातील संपूर्ण मतदान यंत्रणा सकाळीपासून सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात झाली आहे तर सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार होता. मात्र राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

पुणे जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचा आकडा समोर आला आहे. जिल्ह्यात सकाळीपासून दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान पार पडले आहे. राज्यात तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही मोठी तयारी केली होती. या निवडणुकीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Nagar Parishad and nagar panchayat Election: आत्तापर्यंत हाती आलेला मतदानाचा आकडा

दौंड -25.38लोणावळा -39.70चाकण -40.24शिरूर - 25.95इंदापूर - 43.18जेजुरी - 40.55आळंदी -42.80राजगुरुनगर -37.88सासवड -39.88तळेगाव दाभाडे -26.39जुन्नर-31.16भोर -40.58वडगाव-46.10माळेगांव बुद्रुक -41.77मंचर -45.14

Continues below advertisement

Nagar Parishad and nagar panchayat Election: सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात 8.37% मतदान

पुणे जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासांमध्ये जिल्ह्यातील 12 नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून 8.37% मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ११.३० वाजेपर्यंत २०.२२ टक्के मतदान झाले आहे. तर दुपारी दीड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान झाले आहे.