पुणे : महाविकास आघाडीमध्ये (MVA ) कोणताही वाद नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha Election 2024) आमचा फॉर्मुलाही तयार झालाय. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करु, असे सांगतानाच काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांनी राज्यात महाविकास आघाडी 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय. ते पुण्यात (pune News) बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. शेतकरी विरोधातलं केंद्र आणि राज्यातील सरकार आहे. निवडणूक आयोगाचे नियुक्त करण्याचे अधिकार केंद्राकडे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुका सुद्धा पारदर्शी राहतील का नाही? हा प्रश्न निर्माण झालाय, असेही नाना पटोले म्हणाले. 


मणिपूर ते मुंबई, अशी न्याय यात्रा सुरु होणार आहे. उद्याची (गुरुवारी) दिल्लीची बैठक राहुल गांधी यांची यात्रा सुरू होत आहे त्यासाठी आहे. त्यावेली राज्यातील परीस्थितीचा आढावा दिला जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितलं.


देव मोठा की माणूस? 


भाजपच्या ट्विटमध्ये प्रभू रामांना छोटं आणि मोदींना मोठे दाखवलं जातंय, नेमकी काय चालल आहे हे कळायला तयार नाही. देव मोठा की माणूस? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला. 22 तारखेला काहीच नाही, रामनवमी नाही, त्यांना निवडणुका करायच्या आहेत, म्हणून आता करत आहेत, असे पटोले म्हणाले.


लोकसभा लढवणार का? काय म्हणाले नाना पटोले ?


मला पक्षाने आदेश दिला तर मी लोकसभा लढेल, माझा निर्णय नाही. पक्ष ठरवेल, असे नाना पटोले यांनी सांगितलं. एक जानेवारीला शरद पवार यांचा फोन आला होता. आपण बसून बोलू असे ते म्हणले. दिल्लीत सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन बैठक घेऊ. पवार साहेबांचां मेसेज दिल्लीत खरगे, गांधी यांना देणार आहे. आम्ही वंचितबाबत सकारात्मक आहे.सर्वांना सोबत घेऊ जाणार असल्याचेही पटोले म्हणाले.  


वचिंतला इंडिया आघाडीत घेणार ?


प्रकाश आंबेडकरांसदर्भात मला शरद पवार यांचा फोन आला होता. आंबेडकर आणि माझी भेट झाल्याचे पवार यांनी सांगितले आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबात निर्णय घेण्याबद्दल विचारले. यावर मी शरद पवारांना इंडीया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत निर्णय घेऊ म्हटलंय. आम्ही वंचितला सोबत घेण्याबद्दल सकारात्मक आहोत.


समृध्दी टीकास्त्र सोडलं 


समृध्दी मार्गावर रोज अपघात होत आहेत. अनेक जणांचा अपघाती मृत्यू होतोय. या रस्त्यात डिफॉल्ट आहे. त्यात जे केमिकल वापरायचे असतात ते वापरले नाही, ते महाग होते म्हणून. टायर गरम होतात म्हणून ते अपघात होतात. सरकारमध्ये बसलेल्या लोकांची समृध्दी झाली आहे, असे पटोले म्हणाले.