पुणे : दांडेकर पूल येथील मुठा कालव्याची भिंत कोसळल्यामुळे कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीतील अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. या घटनेने परिसरातील बोडेकर कुटुंबियांच्या मुलांच्या भविष्यावर पाणी फिरवलं आहे. मुलाच्या जेईईच्या क्लाससाठी आणलेले सुरेश बोडेकर यांचे पैसे या पाण्यात वाहून गेले आहेत.


बोडेकर यांनी मित्राकडून मुलाच्या शिक्षणासाठी दीड लाख रुपये आणले होते. या रकमेपैकी निम्म्याहून अधिक रक्कम पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे एका बाजुला मोठ्या कष्टानं उभा केलाल्या संसाराची राखरांगोळी झाली, तर दुसरीकडे मुलाच्या शिक्षणासाठी आणलेले पैसेही पाण्यात वाहून गेले.


गेल्या 12 वर्षांपासून बोडेकर कुटुंबिय दांडेकर पूल परिसरातील झोपडपट्टीत राहत आहेत. अशोक बोडेकर मार्केटयार्डमध्ये हमालीचं काम करतात, तर पत्नी शेवंती बोडेकर घरकाम करून पतीला घर चालवण्यात मदत करतात. बोडेकर दाम्पत्याला चार मुलं असून त्यापैकी दोन मुलं अपंग आहेत.


एका मुलाच्या जेईईच्या क्लाससाठी बोडेकर यांनी दीड लाखांचं कर्ज मित्राकडून घेतलं होत. मात्र यातील मोठी रक्कम पाण्यात वाहून गेल्यानं मुलाच्या पुढचं शिक्षणासाठी आता पैसे कसे उभे करायचे असा प्रश्न बोडेकर कुटुंबियांसमोर उभा राहिला आहे.


संबंधित बातम्या

बघे बघेपर्यंत घर भरलं, भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं..! 

पुण्यातील मुठा कालव्याची भिंत नेमकी कशामुळे कोसळली?  

पुण्यात कालव्याची भिंत कोसळली, रस्त्यावर महापुराचं चित्र  

VIDEO: कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर  

PHOTO: कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर