अनैतिक प्रेमसंबंधातून महिलेची गळा चिरुन हत्या
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2016 12:03 PM (IST)
पुणे: अनैतिक प्रेमसंबंधातून महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. रुपाली मरे असं मृत महिलेचं नाव आहे. रुपालीचे आरोपी भारत दुर्गेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुपालीचं आणखी एका तरुणाशी सूत जुळल्याची कुणकुण आरोपी भारतला लागली होती. याचाच राग मनात धरून भारतनं रुपालीच्या हत्येचा कट आखला. घटनेच्या दिवशी भारतनं रुपालीला जेवणाच्या बहाण्यानं बोलवून तिला दारू पाजली. आणि मित्राच्या रिक्षात रुपालीचा गळा चिरून तिची हत्या केली. रुपालीच्या हत्येप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी भारतला अटक केली आहे. या हत्येसाठी भारतनं आणखी कुणाची मदत घेतली का? याचा पोलीस तपास करीत आहेत.