पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या खराळवाडीत एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुहास हळदणकर अस हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. डोक्यात सिमेंटचे गट्टू घालून 4 ते 5 जणांनी हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरु कदमसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

सुहास हळदणकरची हत्येचे आरोपी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते आहेत अशी माहिती समोर आली आहे. सुहास देखील त्याच नगरसेवकाचा कार्यकर्ता होता. मात्र काही दिवसापूर्वी त्याने नगरसेवकाची साथ सोडली होती. त्यानंतर सुहासने महापालिकेच्या बालभवन येथे असणारे सुरक्षा रक्षक हटवण्याची मागणी केली.

मात्र ते सुरक्षा त्या काँग्रेस नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्यानं सुहास ही मागणी करत असल्याचा राग मनात धरत त्याची हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या हत्येनंतर खराळवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी अन्य हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे