मुंबई : मुंबई-पुणे या मार्गावरील रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. मात्र आजपासून वाहतूक सुरळीत होत असल्यांना प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे प्रशासनाने दिली.


शुक्रवारपासून रविवारपर्यंत या मार्गावर सर्व इंटरसिटी एक्स्प्रेस आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. आज वाहतुकीची काय स्थिती असणार हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. मात्र  गेले तीन दिवस सुरळीत चाललेल्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.


मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. तसेच पाणी साचल्यामुळेही रेल्वे मार्गाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे याठिकाणी दुरुस्तीचं काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतलं होतं. दुरुस्तीच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले होते.


प्रवाशांचा गैरसोय लक्षात घेत एसटी महामंडळाने देखील या मार्गावर ज्यादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु त्यासुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट सुरु होती.


संबंधित बातम्या

रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत मुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार

एसटीचा रेल्वेला मदतीचा हात, मुंबई-पुणे मार्गावर दररोज एसटीच्या 180 जादा बसेस धावणार

मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने 'या' एक्स्प्रेस रद्द