मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यानं अनेक ठिकाणी रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. मातीचा ढिगारा हलवणं आणि रेल्वे ट्रॅकची दुरुस्तीचं काम करण्यासाठी मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या काळात रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. दरम्यान एसटी महामंडळाने गाड्या देखील वाढवल्या होत्या पंरतू त्यासुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट सुरु होती. मात्र आता रेल्वेसेवा सुरु झाल्याने प्रवाशांची चिंता मिटली आहे.
संबंधित बातम्या
रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत मुंबई-पुणे मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार
एसटीचा रेल्वेला मदतीचा हात, मुंबई-पुणे मार्गावर दररोज एसटीच्या 180 जादा बसेस धावणार
मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने 'या' एक्स्प्रेस रद्द