पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपेक्षित रकमेची वसुली झाल्यानं, हा टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली  आहे. ते आज पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते. माझाशी बोलताना ते म्हणाले की, ''पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर 2869 कोटी रुपये टोलवसुली होणं अपेक्षित होतं. त्यासाठी 2019 ची डेडलाईन आयआरबीला देण्यात आली होती. मात्र ही रक्कम 31 ऑक्टोबरलाच वसूल झाली आहे. त्यानंतरही पुढचे आठ दिवस आयआरबीनं बिनदिक्कत टोलवसुली केली. ज्यामुळं त्यांना अधिकच्या 7 कोटी रुपयांचा फायदा झाला. ज्याची माहिती कंत्राटदारानेच एमएसआरडीसीच्या वेबसाईटवर दिली आहे.'' त्यामुळं कंत्राटदाराला यापुढं टोलवसुलीची मुभा देणं लोकांच्या हक्कांवर आणि अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे. त्यामुळं हा टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. एक्सप्रेस-वे वरील एकूण टोल वसुली

वर्ष

अपेक्षित टोलवसुली प्रत्यक्ष टोलवसुली
2004 97 कोटी रुपये 28.5 कोटी रुपये
2005 120 कोटी रुपये 54.2 कोटी रुपये
2006 101 कोटी रुपये 61.20 कोटी रुपये
2007 106 कोटी रुपये 148 कोटी रुपये
2008 132 कोटी रुपये 187 कोटी रुपये
2009 139 कोटी रुपये 200 कोटी रुपये
2010 145 कोटी रुपये 214 कोटी रुपये
2011 180 कोटी रुपये 200 कोटी रुपये
2012 189 कोटी रुपये 275 कोटी रुपये
2013 198 कोटी रुपये 294 कोटी रुपये
2014 246 कोटी रुपये 360 कोटी रुपये
2015 258 कोटी रुपये 433 कोटी रुपये
2016 271 कोटी रुपये 413 कोटी रुपये
2017 335 कोटी रुपये
2018 352 कोटी रुपये
एकूण 2869 कोटी रुपये

2867 कोटी रुपये