मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आता तुम्हाला ताशी 80 किमीपेक्षा कमी वेगानं गाडी चालवता येणार नाही. वाहतूक पोलिसांकडून किमान 80 किमी प्रतितास ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
एक्स्प्रेस वेवरील अपघातांचे प्रमांण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला. एक्स्प्रेस वेच्या पहिल्या लेनमध्ये धीम्या गतीने जाणाऱ्या गाड्यांमुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची अडचण होते. त्यामुळे ही वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे. तशी अधिसूचनाच वाहतूक पोलिसांनी जारी केली आहे.
या अटीतून अत्यावश्यक सेवा वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस आणि शासकीय वाहने यांना वगळण्यात आलं आहे. याबाबतची माहिती वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी दिली.