मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याच्या परिसरातील दरड काढण्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक काही काळ बंद राहील.


 
आज आणि उद्या अर्थात बुधवार-गुरुवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर रोड ब्लॉक करण्यात येणार आहे. दुपारी बारा ते साडेतीन या दरम्यान काम सुरु राहिल.

 
एक्स्प्रेस वे कधी बंद राहणार?

 

  • दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान 15 मिनिटांसाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.


 

  • त्यानंतर 2 ते 3 च्या दरम्यान अर्ध्या तासासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


 
एक्स्प्रेस वे वर चार ते पाच ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या दरडी काढण्याचं काम आजपासून सुरु करण्यात येणार आहे. या वेळेत महामार्गावरुन प्रवास टाळावा, असं आवाहन एमएसआरडीसीनं केलं आहे.