पुणे : आजकाल प्रत्येकामध्ये आयफोनची क्रेज आहे. आयफोन वापरणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. अन या खोट्या प्रतिष्ठेसाठी अनेकजण चुकीच्या मार्गाचाही अवलंब करत आहे. पुण्यातील एका उपनिरीक्षकाला आयफोन 6 ची लाच मागितल्यावरून अटक करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशमध्ये कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे याने दरोड्याचा गुन्हा दाखल करायचा नसेल, तर चक्क I-Phone 6 मोबाईल देण्याची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराने शिंदेला I-Phone 5 मोबाईची ऑफर दिली होती.
याची माहिती मिळताच लाचलुचपत विभागाने शिंदेला रंगेहाथ अटक केली.