मुंबई: मुंबईमध्ये जुहू (Juhu Mumbai) परिसरात एक मुलगा दोन वर्षांच्या मुलीवर तोल गेल्याने पडला. मात्र, या घटनेमध्ये त्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील (Juhu Mumbai) जुहू परिसरात एक मुलगा तोल गेल्याने दोन वर्षांच्या मुलीच्या अंगावरती पडला मुलीच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंबीयांनी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील जुहू (Juhu Mumbai) परिसरात ही घटना घडली असून, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलाचा तोल गेल्याने दोन वर्षांच्या मुलीवर पडला, त्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी विधी अग्रहरी नावाची मुलगी तिच्या कुटुंबीयांच्या दुकानाजवळ खेळत असताना ही घटना घडली. मुलीचे वडील विनय अग्रहरी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार,आरोपी हर्षद गौरव त्यावेळी त्याच्या मित्रांसोबत मस्ती करत होता. त्याचा मित्र शाहनवाज अन्सारीही त्याच्यासोबत होता, मुलीच्या आईने त्यांना इथे खेळू नका आणि दुसरीकडे जा असं सांगितलं होतं. पण ते तिथेच थांबले.


दोघेही मस्ती करत होते, मस्करी करत होते, यादरम्यान हर्षदचा तोल गेला आणि तो त्या चिमुकल्या मुलीच्या अंगावर पडला. त्यामुळे मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि कुटुंबीयांनी तिला तातडीने मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. जिथे मुलीवर उपचार सुरू होते. दोन दिवसांनी चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 अंतर्गत जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भरधाव पिकअपची धडक, ट्यूशनला निघालेली श्रेया जागेवरच गतप्राण!


छत्रपती सभाजीनगरच्या वैजापूर शहरात भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत एक 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील म्हसोबा चौक परिसरात घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. श्रेया हरिश्चंद्र दुसाने (वय 15 वर्षे, राहणारआनंदनगर) असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे. या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार श्रेया ही सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आनंदनगर येथून शिवप्रतापनगर येथे ट्युशनसाठी जात असताना म्हसोबा चौक परिसरात रास्ता ओलांडत असताना भरधाव पिकअपने तिच्या सायकलला धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला उपस्थित नागरिकांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासून मृत घोषित केले.