Honey bee Attack : मागील  (Honey Bee)  काही दिवसांपासून पुण्याजवळील  (Honey Bee) अनेक किल्ल्यांवर मधमाश्यांचे हल्ले होत आहे. त्यातच आता सिंहगडावरदेखील मधमाशांनी केलेल्या हल्ल्याच्या एकाच दिवसात दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पर्यटक आणि अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. किरकोळ मधमाश्या चावलेल्या दोन जणांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. पहिला हल्ला सकाळच्या सुमारास झाला तर दुसरा हल्ला दुपारच्या सुमारास झाला आहे. 


किल्ल्यातील बाधित क्षेत्र निषिद्ध म्हणून सांगण्यात आले आहेत आणि दोन वन कर्मचारी त्यांचे रक्षण करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून किल्ल्याच्या पायथ्याशी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती आणि खानापूर येथील वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी रवाना करण्यात आला असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


या हल्ल्यात कोणातीही जिवीतहानी झाली नाही आहे. मात्र यापुढे येणाऱ्या पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उन्हाळ्यात मधमाशांच्या हल्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या सर्व पर्यटकांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


मधमाशांच्या हल्ल्यांत वाढ


काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यात एकाच  कुटुंबातील 10 जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. सिंहगड किल्ल्याजवळ असलेल्या सांबरेवाडी येथील भवानी आई माता देवीच्या दर्शनासाठी जात असताना एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाश्यांनी हल्ला होता. या हल्ल्यात सर्वजण गंभीर जखमी झाले होते. मधमाशांचा हल्ला अचानक आणि इतका तीव्र होता की कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्ध पडले होते. काही ग्रामस्थ आणि इतर कुटुंबीयांकडून माहिती मिळाल्यानंतर जखमींना शोधून तातडीने उपचारासाठी खासगी वाहनाने रुग्णालयात नेण्यात आले होतं. जखमी हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील खामगाव येथील होते. त्यानंतर हल्ले होऊ नये यासाठी वनविभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे, हल्ल्याच्या ठिकाणी काही फलकदेखील लावण्यात आले आहेत. 


हल्ला टाळण्यासाठी काय करावं?


मधमाशांचे हल्ले टाळण्यासाठी लोकांनी सावधगिरीचे उपाय करावेत. हलक्या रंगाचे कपडे घालणे, मजबूत परफ्यूम टाळणे आणि मधमाशांच्या पोळ्यांना त्रास न देणे यासारख्या सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. हल्ला झाल्यास, लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असाही सल्लाही दिला आहे. 


संबंधित बातमी-


Honey Bee : मुंबईचे पर्यटक फ्लॅशलाईटने जुन्नरच्या भुतलेणी बघत होते तेवढ्यात मधमाशांनी केला हल्ला, पाचजण जखमी