पुणे : शरद पवार हे विरोधी पक्षाची भूमिका खूप चांगल्या प्रकारे वठवतात. जेव्हा जेव्हा ते विरोधी पक्षात राहिलेत, तेव्हा तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाचं खूप चंगल्या प्रकारे काम केले आहे, असा टोला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लगावला. ते पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते.
“1985-86 साली शरद जोशींनी हमीभावासाठी मोठं आंदोलन उभारलं होतं. देशभर त्यावरुन रान पेटलं होतं. त्यानंतरही काँग्रेसने काही केले नाही. मग अटल बिहारी वाजपेयींनी स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. पवार केंद्रीय मंत्री असताना, तो अहवाल आला. त्यावेळेच तो अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या.”, असे म्हणत खासदार काकडेंनी पवारांवर निशाणा साधला.
काकडे पुढे म्हणाले, “स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही 8 वर्षे गेली. मात्र अखेर मोदी सरकारने अहवालातील काही गोष्टी घेत, दीडपट हमीभाव जाहीर केला.”
पवारांनी मोदींचे अभिनंदन करण्याऐवजी ते लोकांची दिशाभूळ करत आहेत, असेही काकडे म्हणाले.
6 ते 8 महिन्यात पूर्ण कर्जमाफी!
36 हजार कोटींची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. काही आकडेवारी आणि टेक्निकल गोष्टी असतात. पण येत्या 6 ते 8 महिन्यात पूर्णपणे कर्जमाफी होईल, असेही काकडेंनी यावेळी सांगितले. तसचे, फसव्या गोष्टी राज्य सरकार करणार नाही, असेही सांगायला काकडे विसरले नाहीत.
पवार विरोधी पक्षात राहूनच चांगलं काम करु शकतात : संजय काकडे
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
04 Feb 2018 08:32 PM (IST)
36 हजार कोटींची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. काही आकडेवारी आणि टेक्निकल गोष्टी असतात. पण येत्या 6 ते 8 महिन्यात पूर्णपणे कर्जमाफी होईल, असेही काकडेंनी यावेळी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -