Amol kolhe on Shirur Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे शिरुर लोकसभेत (Shirur Loksabha) माझ्या विरोधात छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) उमेदवारी देणार होते, असा दावा शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर अन शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे कोल्हे म्हणाले.
जे उमेदवार बेडूक उड्या घेऊन आजवर ज्यांच्यावर आरोप करत होते, त्याच अजित पवारांच्या वळचणीला जाऊन बसलेत. त्यामुळं शिवाजीराव आढळराव पाटलांविषयी फार बोलणं उचित राहणार नाही. ते पहिल्या पसंतीचे उमेदवार असते तर नक्की मी आढळरावांवर भाष्य केलं असतं, असं म्हणत कोल्हेंनी आढळराव पाटलांची खिल्ली उडवली. आढळरावांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही तास आधीचं कोल्हेंनी भुजबळांना शिरुरमधून उमेदवारी देण्याच्या संदर्भात खुलासा केल्यानं शिरूर लोकसभेत नव्या चर्चांना उधाण आलं आहे. भोसरी विधानसभेत अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सचिन अहिर उपस्थित होते. ही निवडणूक देश पातळीवरची निवडणूक आहे. सध्या विरोधकांकडे प्रचाराचे कोणतेही मुद्दे नाहीत. म्हणून ते वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करत असल्याचेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 4 जूलना निकाल लागणार आहे.
शिरुर लोकसभेत राजकीय वातावरण तापलं
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. यातच राजकीय नेते ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिरुर लोकसभेतही राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बड्या राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका शिरुर लोकसभा मतदारसंघात सुरु आहे. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून डॉ. अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना संधी देण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार ऐकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते, तेच उमेदवार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमने सामने आहेत. त्यामुळं राजकीयवातावरण चांगलच गरम झालंय.
महत्वाच्या बातम्या: