पुणे : प्रत्येक आई पोटच्या मुलांसाठी वाटेल(Leopard Attack) तो संघर्ष करायला तयार असते. अशीच एका आई थेट बिबट्याशी भिडल्याचं पुण्यातील आंबेगाव गावात पाहायला मिळालं. बिबट्याच्या जबड्यात असणाऱ्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी तिने अक्षरशः स्वतःच्या जीवाची ही पर्वा केली नाही. सोनाली करगळ असं या हिरकणीचे नाव आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात सोमवारी हे मेंढपाळ कुटुंबीय शेतात झोपलं होतं, तेव्हाच मध्यरात्री दोन वाजता हा थरार घडला. 


सोनाली यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, रात्री दोन वाजले होते. सगळी कामं आटपून आम्ही झोपलो होते. त्यावेळी झोपला असलेल्या मुलाचा हात अचानक पांघरुणाच्या बाहेर निघाला होता. हा हात पाहून रात्री दोनच्या सुमारास आम्ही झोपलो होते  त्या ठिकाणी बिबट्या आला. बाळाला त्याने ओढण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात हालचालीमुळे मला जाग आली आणि बिबट्या पाहून आणि त्याच्या तोंडात आपलं मुल पाहून माझ्या मनात धडकी भरली. मात्र बिबट्या जेवढ्या आक्रमक पद्धतीने आला तेवढ्याच आक्रमक पद्धतीने मी बिबट्यावर धावून गेली. एका हाताने मुलाला बिबट्याच्या जबड्यातून बाहेर काढलं आणि एका हाताने बिबट्याला मागे सारण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पाहून जर घाबरले असते तर आज माझं मुल बिबट्याने माझ्या डोळ्यादेखत खाल्ल असतं. 


हिरकणीचं रुप बघितलं अन् बिबट्याने पळ काढला...


सोनाली या आपल्या बाळाला वाचवण्यासाठी बिबट्याशी लढल्या. त्यावेळी अनेकांनी आरडा ओरड सुरु केली होती. कुटुंबातील बाकी सदस्यदेखील तोपर्यंत एकत्र आले होते. मात्र बिबट्यानं सोनालीचं रुप पाहून पळ काढला.


मुलाच्या हाताला ईजा


या हल्ल्यात सात महिन्याचा मुलाला थोडी इजा झाली आहे. त्यानंतर मुलाला आणि आई सोनल यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर लस देण्यात आली आहे. सध्या उपचार सुरु आहेत.


गावात तीनवेळा बिबट्याचा हल्ला


आतापर्यंत या गावात तीनवेळा बिबट्याचा हल्ला झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून आज हे बाळ वाचलं मात्र यापुढे हल्ला झाला तर गावातील नागरिकांना धोका आहे. बिबट्याची दहशत कमी होण्यासाठी उपाययोजना राबवल्या जायला हव्यात, नाही तर असे अनेक जीव बिबट्याच्या भीतीने प्राण गमावतील, असं बाळाच्या  वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


इतर महत्वाची बातमी-


ऐकावं ते नवलच! 'या' देशात केली जातेय सापांची शेती, अनेकजण मिळवतायेत भरघोस नफा