मुलीची हत्या करुन आईची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 23 Jul 2016 09:47 AM (IST)
पिंपरीः पिंपरी चिंचवड मध्ये सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नीलम भामे असं आईचं नाव असून मुलीचं नाव लावण्या आहे. कासारवाडी येथे दुपारी हा प्रकार उघडकीस आला. पती कामावर गेल्यानंतर आत्महत्या केल्याचं भोसरी पोलिसांनी सांगितलं आहे. नीलम यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ही सुसाईड नोट देखील भोसरी पोलिसांच्या हाती लागली आहे. नीलम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागील आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांचा कोणावर संशय नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची उकल काय निघते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.