पुणेः पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एका तरुणाने व्यासपीठावर येऊन घोषणाबाजी केली. सचिन खरात असं या तरुणाचं नाव असून तो पुण्याच्या रिपाई गटाचा शहर अध्यक्ष असल्याचं कळतंय. सध्या पुणे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

 

 

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात रिपाईच्या खरात यांच्याकडू स्टेजवर चढून घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न जागीच हाणून पाडला.

 

 

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करावी या मागणीसाठी रिपाई गटाकडून हा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती आहे. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणीही रिपाई गटाने केली.