पुणे: पुण्यातील स्वारगेट परिसर म्हणजे सध्या लुटीचे ठिकाण बनले आहे. स्वारगेट बस स्थानकामुळे येथे देशभरातून प्रवाशांची सतत गर्दी असते. त्यामुळे मोबाईलचा बॅलेन्स संपला तर त्याला अधिकृत मोबाईल विक्रेत्यांऐवजी इतर मोबाईल विक्रेत्यांकडे जावे लागत आहे. पण हे विक्रेतेच सध्या लुटारुंप्रमाणे वागत आहेत.

 

जर तुम्ही या विक्रेत्यांकडून प्रीपेडचे कोणतेही रिचार्ज केले, तर तुम्हच्याकडून त्या रिचार्जवर तुम्हाला ५ रुपयांचा अतिरिक्त चार्ज वसूल केला जातो.

 

वास्तविक, मोबाईल विक्रेत्यांकडून प्रत्येक विक्रेत्याला ई-रिचार्जसाठी 10% कमिशन मिळते. त्यामुळे त्यावर अतिरिक्त चार्ज वसूल करण्याचा अधिकार या मोबाईल विक्रेत्यांना नाही. पण त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मोबाईल विक्रेत्यांकडून लूट सुरु आहे.

 

 

विशेष म्हणजे, यावर विचारणा केल्यास या मोबाईल विक्रेत्यांकडून अरेरावीची केली जात आहे. त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यांच्या या जाचावर कोण लगाम घालणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.