मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2016 03:37 AM (IST)
पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा वाहतुक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ दोन अवजड वाहन बंद पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या अडकलेली वाहनं बाजूला घेऊन एक लेन सुरु करण्यात आली आहे. मात्र संथ गतीने वाहतूक सुरु असून ती पूर्वपदावर येण्यास आणखी वेळ लागणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेक प्रवाशांनी बाहेरगावी विकेंड साजरा करण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे शनिवारपासूनच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आता सलग दुसऱ्या दिवशी एक्स्प्रेस वे वर खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे.