पुणे : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंनी मोठा  (Vasant More MNS) निर्णय घेतला आहे. त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resignation) राजीनामा दिला आहे.  'मला माझ्याच पक्षात वारंवार विरोध होत आहे. माझ्या पक्षनिष्ठेवर वारंवार प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. हे मला सहन होत नाही आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली आहे. राज ठाकरेंवर कधीच नाराजी नव्हती, वारंवार माझ्यावर संशय घेतला जायचा. येत्या दोन-तीन दिवसांत पुढील निर्णय घेणार आहे, असंही ते म्हणाले. 


वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?


'मी लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. मात्र मला उमेदवारी मिळू नये, यासाठी शहरातील काही पदाधिकारी काम करत असतील तर हे सगळं चुकीचं आहे. ज्या पुण्यात दुसऱ्यानंबरचा सगळ्यात मोठा पक्ष मनसे होता. शहराचा विरोधीपक्षनेता मनसेचा होता. त्या पुण्यात मनसेची मोठी ताकद आहे. तरी या शहरात मनसेची ताकद नाही, असं दाखवलं जात आहे. याचं कारण अजून समजू शकलं नाही . मला माझ्या पक्षातूनच विरोध होत आहे. हे सगळे स्थानिक नेते माझ्या एकनिष्ठेवरुन प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळ मी नाटक करत असल्याचा संशय अनेकजण घेत आहेत. माझ्या संदर्भात मुंबईत नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात आहे, ही चुकीची बाब आहे. कोअर कमिटीच्या लोकांकडून हा सगळा प्रकार आहे', असं वसंत मोरे म्हणाले. 


वयाच्या 48 वर्षातले 25 वर्ष मनसेत घालवली पण...


वसंत मोरे पुढे बोलताना म्हणाले की,  या सगळ्या खदखदीसंर्भात मी अनेकदा राज ठाकरे यांच्या कानावर घातल्या आहेत. अमित ठाकरेंनादेखील सांगितल्या आहेत. मला माझ्याच पक्षातून विरोध झाला. वयाच्या 48 वर्षातले 25 वर्ष मनसेत घालवली. येत्या काहीच दिवसात मी माझा निर्णय स्पष्ट करेन आणि पुणेकरदेखील या निर्णयात सहभागी असतील, असंही त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं आहे. 


दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार


'मी सध्या कोणत्याच पक्षात जाणार नाही आहे. मात्र येत्या दोन दिवसांत माझी भूमिका सगळ्यांसमोर मांडणार आहे. सगळे माझे कार्यकर्ते आणि मायबाप पुणेकर माझ्या सोबत आहेत', असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Vasant More Resignation : मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!