पुणे: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. अशातच जागावाटप आणि उमेदवारांची चाचपणी या घडामोडींना वेग आला आहे. अशातच राज्यात काही ठिकाणी फुटीनंतर वेगळे झालेले एकाच पक्षाचे दोन वेगवेगळे गट आमनेसामने लढण्याच्या तयारीत आहे. या अनुषंगाने मोठी तयारी देखील सुरू आहे. मात्र, जुन्नर तालुक्यात विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अतुल बेनके यांनी मोठं वक्तव्य केल्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


महाराष्ट्रात कुठं असं घडलं नाही. मात्र, जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघपणाने पुढे जाणार कारण पवार साहेबांचा हात माझ्या पाठीमागे आहे, असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं आहे. उद्यापासून ओझरला अभिषेक करून प्रचाराला सुरुवात करणार आहे, आता काय मागे हटायचे नाही. आपण सर्व जण एक दिलाने एक विचाराने पुढं जायचं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे झाले नाही मात्र, जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघपणाने पुढे जाण्यात यश प्राप्त करेल. जुन्नर तालुक्यात सब एक है. आम्ही एक विचाराने पुढे जाणार आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये घड्याळ म्हणून हा पक्ष पुढे जाणारच आहे. मात्र, शरद पवार ही हात माझ्या पाठीमागे उभा आहे. तो कसा आहे ते वेळ काळ आल्यावर सांगेल असं मोठं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे. याबाबत अद्याप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोणतही भाष्य किंवा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच बेनकेंच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर वारंवार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली होती.


काय म्हणालेत अतुल बेनके?


उद्या पहाटे ओझरला पहाटे अभिषेक करून आपण प्रचाराला सुरूवात करत आहोत. आता मागे हटायचं नाही. आपण एका दिलाने आणि एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पुढे घेऊन जायचं आहे. राज्यात कुठेही असं घडलं नाही, मात्र जुन्नर तालुक्यात एकसंघपणाने पुढे जाण्यात यश प्राप्त केलं आहे. मला काल प्रश्न केला, तुम्ही फार खुललेले दिसत आहात दोन तीन दिवस झाले, त्यावर मी म्हटलं. त्याचं कारण देखील तसं आहे. जुन्नर तालुक्यात सब एक है. आम्ही एक विचाराने पुढे जाणार आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ म्हणून हा पक्ष पुढे जाणारच आहे. मात्र, शरद पवार यांचा हात आणि आशिर्वीद माझ्या पाठीमागे उभा आहे. तो कसा आहे, तो मी आत्ता सांगणार नाही, ते वेळ आल्यावर कळेल.