डोक्यात कोयत्याने 17 वार करुन डेअरी व्यावसायिकाची निर्घृण हत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2017 08:32 AM (IST)
नवले ब्रीजजवळच्या पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली.
प्रातिनिधीक फोटो
पुणे : पुण्यात दूध डेअरी व्यायसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डोक्यात कोयत्याने 17 वार करुन बाळासाहेब पाटील यांचा खून झाला. या प्रकरणी कुणाल रणदिवे आणि सागर गिरी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. नवले ब्रीजवरच्या पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. पैशांच्या वादातून बाळासाहेब पाटील यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपी कुणाल रणदिवेचं दुग्धजन्य पदार्थांचं दुकान आहे. बाळासाहेब पाटील यांनी कुणाल रणदिवेकडून उधारीवर पैसे घेतले होते. मात्र, पैसे देण्यास ते टाळाटाळ करत होते. यामुळे आरोपी कुणाल रणदिवे आणि सागर गिरी यांनी पाटील यांना मारण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार बाळासाहेब पाटील यांना दारु पाजून नर्हे-कात्रज रस्त्यावर ठिकाणी, त्यांच्या डोक्यात कोयत्याने 17 वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.