लिफ्ट अडकल्यानंतर, या सर्वांना अर्ध्यावर लिफ्ट थांबवून, स्टूलवरुन उतरुन खाली घेण्यात आलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधोमध ही लिफ्ट अडकली होती. शेवटी माहितगार लिफ्टमॅन असल्याने त्याने लिफ्ट उघडून, या सर्वांची सुटका केली.या प्रकारामुळे प्रशासनासह सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली.
लिफ्टमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडतोय असं नाही. तीन आठवड्यापूर्वी एक पत्रकार तब्बल वीस मिनिटं लिफ्टमध्ये अडकला होता. त्यावेळी तर लिफ्टमध्ये कोणीच नव्हतं.
तर काही महिन्यांपूर्वी एक कर्मचारी असाच अडकला आणि बाहेर पडताना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. इतके प्रकार घडूनही प्रशासन याकडे कानाडोळा करून अनेकांच्या जीवाशी खेळतंय.
आता खुद्द महापौर अडकल्यानंतर तरी या लिफ्टची डागडुजी होईल अशी अपेक्षा आहे.