मावळ, पुणे : मावळ लोकसभेवर (Maval Loksabha) भाजपचे प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे (Ravindra Bhegade) यांनी दावा करत भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी, त्यांना आम्ही निवडून आणू असा आग्रह धरला होता, मात्र वरिष्ठांनी तंबी देताच भाजप प्रचार प्रमुखाची भाषा बदली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात दावे केले जातायत, आरोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.


महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा असून यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा ताकतीने काम करेल, उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महायुती जीवाचं रान करेल, अशी नरमाईची भूमिका भाजप प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे घेतली आहे. आधी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना वरिष्ठ नेत्यांनी फटकरल्याने ही नरमाई ची भूमिका घेतल्याचं बोललं जातं आहे.


काय म्हणाले होते रविंद्र भेगडे?


रविंद्र भेंगडे म्हणाले होते की, मावळ लोकसभेतून यावेळचा (खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणणार, असा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. पण तो उमेदवार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे नको तर मावळमधील भाजपचे बाळा भेडगेचं असतील, असे सूतोवाच मावळचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केलं होतं. आतापर्यंत अनेकांनी आम्हाला उमेदवार नाही म्हणून हिणवलं. त्यांना आम्हाला सांगायचं आहे की आमच्याकडे बाळा भेगडेंसारखा उमेदवार आहे. आम्हाला बाळा भेगडेंना खासदार म्हणून पाहायचं आहे. निवडणूक प्रमुख सांगतो की आम्हाला आमच्या मावळचा माणूस दिल्लीला पाठवायचा आहे. यासाठी आपल्याला ताकदीने काम करायचं आहे. भाजपकडे उमेदवार नाही, असं जे म्हणतात त्यांना मला सांगायचं आहे की, आमच्याकडे ताकदीचा खासदारकीचा उमेदवार आहे आणि आमच्याकडे आमदारकीचादेखील उमेदवार आहे. तुम्ही आमचा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करा आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु, असं ते म्हणाले होते. 


महायुतीचा उमेदवार निवडून आणू!



 मात्र त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना तंबी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी नरमाईची भाषा केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच यंदा पंतप्रधान करायचं आहेय त्यासोबतच राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे. यंदा महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काळाच वरिष्ठ मंडळी जो निर्णय घेतील त्या उमेदवाराला आम्ही एकत्र निवडून देणार आहोत, असं ते म्हणाले आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar Lonavala : भाजप म्हणजे वॉशिंग मशीन, आरोप करा आणि पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा; शरद पवारांचा हल्लाबोल