पुणे : पुणे, शिरुर आणि मावळ लोकसभेसाठी मतदान पार पडत आहे. त्यात तिन्ही लोकसभा मतदार संघात तगडी लढत आहे. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप झाल्यानंतर आता मतदानाच्यादिवशीदेखील विरोधी उमेदवारांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संज्योग वाघेरेंची आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


मतदानाच्या दिवशी उमेदवारांना मोटारीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास मनाई असताना देखील मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मोटारीवर त्यांचे 'मशाल' हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मोटारीवर मशाल या निवडणूक चिन्हाचे स्टिकर लावून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड- उघड भंग आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. 


एकमेकांच्या कृत्यावर बारीक लक्ष


मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात तगडी लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचा जंग जंग पछाडला. अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. विविध प्रश्न आणि समस्या मांडून मावळकरांना वेगवेगळी आश्वासनं दिले. त्यानंतर दोन्ही उमेदवारांकडून काही प्रमाणात संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यकर्त्यांना दमदाटी झाल. अखेर आज मतदानाचा दिवस आला तरीही एकमेकांवर बारीक लक्ष असल्याचं दिसत आहे. कोण आचारसंहितेचा भंग करत आहेत. कोणाचे कार्यकर्ते काय करत आहेत? याकडे दोन्ही उमेदवारांचं लक्ष आहे. 


पुणे  मावळ आणि शिरुरमध्ये अनेक ठिकाणी EVM मशीन बंद


पुणे  मावळ आणि शिरुरमध्ये अनेक ठिकाणी EVM मशीन बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक रांगेत उभे असल्याचं दिसून आलं. मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी 24 बॅलेट युनिट 6 कंट्रोल यूनिट आणि  14 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे.


इतर महत्वाची बातमी-


बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर


Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार


 नारायण राणे-विनायक राऊतांमध्ये चुरशीची लढत, रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज