पुणे : पुण्यात अनेक ठिकाणी सध्या मेट्रोची (Pune Metro Accident) कामं सुरु आहेत. यात रात्रंदिवस ही कामं केली जात आहे. त्यातच मेट्रोचं काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. मेट्रोच्या कामासाठी मोठा पिलर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकच्या धडकेमुळे रस्त्यावरुन चालत निघालेला हा तरुण ट्रक खाली येऊन हा अपघात घडलाय. यात एका तरुणाचे दोन पाय निकामी झाले आहेत. 


पुण्यातील बाणेर रस्त्यावर मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीतदेखील बदल करण्यात आले आहेत. त्यातच काल रात्री बाणेर परिसरात मेट्रोचं काम सुरु असताना दुर्घटना घडली. मेट्रोच्या कामासाठी रोज अनेक ट्रक पिलर घेऊन शहरात प्रवास करतात. त्यात रात्रीची वेळ असल्याने या ट्रकने स्पीड वाढवली आणि रस्त्यावरुन जात असलेल्या एका तरुणाला थेट धडक दिली. या धडकेत एका तरुणाच्या पायाला चांगलीच दुखापत झाली आणि दोन्ही पाय निकामी झाले. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात दोन्ही पाय गेल्याने आयुष्यभरासाठी ब्रेक लागला आहे. 


मेट्रोचं विस्तारीकरण जोरात


राज्य मंत्रिमंडळाने रोजी पुणे महानगर मेट्रो रेल (Pune Metro)  प्रकल्प टप्पा-1 मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक  आणि  रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) (Pune Metro Vanaz to chandani Chowk ANd Ramwadi To Wagholi ) या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath shinde)यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रो मार्गिकेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मार्फत शासनाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक 1.12किलोमीटर लांबीची असून या मार्गिकेवर 2 स्थानके प्रस्तावित आहेत. रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) मार्गिकेची लांबी 11.63 किलोमीटर असून या मार्गिकेवर 11 स्थानके प्रस्तावित आहेत. 


 


इतर महत्वाची बातमी-


Pune Accident : बापानंतर आता आजोबाचा नंबर; ड्रायव्हरला डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकी प्रकरणी सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी


Pune Porsche Car Accident : घर, बार, अपघात स्थळ सगळे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच बाहेर येणार