पुणे : गेल्या 15 दिवसांपासून कोथरुडमधील कर्वे पुतळा परिसरात असलेला महर्षी कर्वेंचा पुतळा त्याच्या जागेवरुन काढण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र कोथरुडमधील महर्षी कर्वेंचा पुतळा नूतनीकरणासाठी काढण्यात आल्याचं समोर आलं आहे.


याप्रकरणी विचारणा केल्यावर पालिका प्रशासनानं याचठिकाणी नवा पुतळा बसवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा पुतळा डागडूजीसाठी काढून ठेवण्यात आला आहे, लवकरच याठिकाणी नवा पुतळा बसवण्यात येईल असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर याबाबतच्या उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र आता या पुतळ्याचं डिजिटल आर्किटेक्टद्वारे नूतनीकरण होणार असल्याचं समोर आलं आहे.

या पुतळ्यासाठी पुणे महापालिकेकडून 55 लाखांच्या निधीची घोषणाही करण्यात आली आहे. नव्या पुतळ्याजवळ महर्षी कर्वेंचा जीवनप्रवास आणि त्यांच्या कार्याची माहिती मांडली जाणार आहे.