पुणे : अनेकदा विसर्जनावेळी पाऊस पडतो. यावर्षी (Pune Weather Update) देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशीला पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मंडळांनी नियोजन करताना पावसाचा अंदाज बांधून मग नियोजन करावं, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


72 तास राज्यात माध्यम स्वरुपाचा पाऊस


विदर्भापासून कोकणापर्यंत द्रोणिका रेषा तयार झाल्यामुळे पुढचे 72 तास राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. राज्यात कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. पुणे आणि आजुबाजूच्या परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस बघायला मिळेल तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनची काय परिस्थिती? 


जून ते सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 5-6 टक्के कमी पाऊस पडलेला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात सामान्य स्वरूपाचा पाऊस झाला असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हवामानान खात्याने मान्सून सुरू होण्याआधी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे. एल नीनोचा प्रभाव या पावसावर बघायला मिळाला आहे. त्यामुळे यंदा पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. अनेक वर्षांनंतर पावसाने एवढी मोठी विश्रांती घेतली होती.  त्यामुळे अनेक परिसरात दुष्काळ निर्माण होण्याची परिस्थिती होती. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा कम बॅक केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 


पुण्यात वातावरण कसं असेल?


26 सप्टेंबर : आकाश सामान्यतः आणि पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


27 सप्टेंबर : आकाश सामान्यतः आणि पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


28 सप्टेंबर : आकाश सामान्यतः आणि पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


29 सप्टेंबर : आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


30 सप्टेंबर : आकाश अंशतः आणि सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


1 ऑक्टोबर : आकाश अंशतः आणि सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


2 ऑक्टोबर : आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाची बातमी-