Mayuresh Vanjale MNS Candidate Khadakwasla: पुण्यातून खडकवासला मतदारसंघातून सोनेरी आमदार अशी ओळख असलेले स्व. आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना मनसे कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. साधारण बारा वर्षानंतर वांजळे यांच्या कुटुंबायात ही उमेदवारी देण्यात आली आहे 2009 ला मनसेचे पहिले आमदार म्हणून रमेश वांजळे हे जिंकून आले होते. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. मात्र, आता बारा वर्षानंतर मनसेने पुन्हा एकदा वांजळे कुटुंबीयांवर विश्वास दाखवला आहे आणि मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यांचं वय 27 वर्ष आहे. सत्ताविसाव्या वर्षी ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांची आई आणि बहीण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे आणि मुलगा म्हणजेच मयूरेश वांजळे हे मनसेकडून विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. 


त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबात एबीपी माझाशी बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुढे गेले त्याचा शोधीत मारग। चला जाऊ माग घेत आम्ही॥ वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी। पूर्वकर्मा होळी करुनीया॥ अमुप हे गाठी बांधू भांडवल। अनाथा विठ्ठल आम्हा जोगा॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें। नामसंकीर्तनें गोविंदाच्या॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा। होईल हा सोपा सिद्ध पंथ॥ तुका म्हणे घालू जीवपणा चिरा। जाऊ त्या माहेरा निजाचिया॥ या अभगांचा मी माझ्यामध्ये ओढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने की, जो मार्ग मला माझ्या भाऊंनी दाखवण्याचे मार्ग माझ्या माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दाखवलं. त्या मार्गावर चालत जाणार आहे. त्यामुळे माझ्या जनतेचा विकास होणे हे निश्चित आहे. 


12 वर्षांनी वाजळेंना उमेदवारी


आई आणि बहीण दोघी राष्ट्रवादीमध्ये आहेत, उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती, यावर बोलताना मयुरेश वाजंळे म्हणाले, त्यांना देखील अश्रू अनावर झाले. शेवटी आपल्या घरातलं मुलगा जेव्हा कष्ट करतो, पोरगा कष्ट करत असतं आणि त्याला त्या कष्टाचं यश, त्या यशाचं फळ मिळू देऊ लागते त्यावेळेस घरातल्यांना आनंद निश्चितच होतो. पण त्यांची पहिली प्रतिक्रिया हीच होती की खूप चांगल्या पद्धतीने तो काम केले आणि तुझ्या कार्याला यश नक्कीच मिळणार. तुला फळ त्याचे मिळालेलं आहे त्या उमेदवारीच्या स्वरूपाने असं त्यांनी म्हटलं.



कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार?


सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आहे बेरोजगारीचा. मला माझ्या मतदारसंघात लवकरात लवकर एमआयडीसी हवी आहे. माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये खूप जास्त प्रमाणात युवा आहे. जो आज चाकण कुठेतरी हिंजवडीला आयटी पार्क मध्ये चाकण एमआयडीसी याठिकाणी त्यांना जाऊन उदरनिर्वाहासाठी काम करावे लागते आहे. त्यांना तिथे जावे लागते, जर त्यांचा तो प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या सर्व युवकांसाठी याच ठिकाणी काहीतरी चांगल्या संधी उपलब्ध असेल अशा हिशोबाने मला इथं लवकरात लवकर पहिले एमआयडीसीचे काम काम सुरू करायचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


वडिलांच्या आठवण आली होती तर...


वडिलांच्या आठवण आली होती तर अश्रू अनावर होतात. पण आपण रडणारे नाही या विश्वासाने आपल्याला हा लढा द्यायचा आहे. हाच विश्वास जनतेने दिला आहे, त्या विश्वासावरती खरं उतरण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पुढचा रोड मॅप तर तयारच आहे, पुर्ण ताकतीने उतरायचं आहे, लढायचं आहे, असंही ते यावेळी म्हणालेत.