Pune News: दौंड, पुणे : राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. भाजप गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा (Crime) आरोप अनेक विरोधक करत आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील कैद्यांवरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आगामी निवडणुकीसाठी तुरुंगात असलेल्या कैद्यांना बाहेर काढले जात आहे. कैद्यांना जेलमधून बाहेर काढून त्यांना राजकारणात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले आहे. त्यासोबतच अनेक मुद्द्यांवरुन त्यांनी सरकारवर हल्लाबोलदेखील केला.
कैद्यांवरुन सरकार गंभीर आरोप करताना संजय राऊत म्हणाले की, येणाऱ्या 2024 निवडणुकीत भाजप आणि शिंदे या गुन्हेगारांचा आणि काही त्यांचा निवडणुकीत दडपशाहीसाठी वापर करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याचा एक पथक नेमले असून गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढण्याचे काम हे सरकार करत आहे. कुठला पोलीस अधिकारी जामीनावर सुटून सरकारसाठी काम करत आहे. याची माहिती लवकरच उघड करणार आहे.
बारामतीत शरद पवार जो उमेदवार देतील तोच निवडून येणार
येत्या निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, भाजप हा आंतरराष्ट्रीय पक्ष, तो बाहेर देशात जाऊनसुद्धा निवडणूक लढवेल. त्यांचं ते देखील टार्गेट असू शकतं. मात्र भाजपनं 12 गावचे लफंगे घेऊन पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्याकडे स्वतःचं असं काही नाही. बारामतीत भाजपचा स्वतःचा उमेदवार असा कोणी नाही. शुद्ध आणि हिंदुत्ववादी उमेदवार नाही. त्यामुळे बारामतीत शरद पवार जो उमेदवार देतील, तोच निवडून येणार, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
2024 मध्ये मोदी येणार नाही...
संजय राऊत म्हणाले की, मोदींनी ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्रिमंडळमध्ये आहेत. त्यात हर्षवर्धन पाटील म्हणतात मला शांत झोप लागते. आजही देशात आमच्या सारखे लोक आहे. आम्ही गुडघे टेकणार नाही. आज भाजपमध्ये गेले आहेत ते 2024 ला आमच्या दारात उभे राहतील.ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते लोकांना आवडलं नाही. 2024 मोदी येणार नाही.सरकारने पालिका जिल्हा परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी. मोदींनी प्रचाराला यावे आणि एक महिना राहावे आणि मुंबई महापालिका जिंकून दाखवावी, असा आव्हानंही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :