TB War Room Pune: क्षयरोग निर्मुलनासाठी पुण्यात वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. ही राज्यातली पहिली क्षयरोग वॉर रुम असणार आहे. राज्यस्तरीय क्षयरोग अंमलबजावणी कक्ष (वॉर रूम) तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते या वॉर रुमचं उद्घाटन करण्यात आलं आलं. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ. रामजी अडकेकर, सी.एच.आई फौंडेशनच्या श्रीमती अनन्या व बी.एम.जी.एफ फौंडेशनचे डॉ.संदीप भारस्वाडकर, डॉ.समीर कुमटा उपस्थित होते.
नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुराव्याद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे गाव पातळीपर्यंत काम करुन या कार्यक्रमात लोकसहभाग घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या हस्ते येथे उभारण्यात आलेल्या वॉर रुमच्या उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य होण्यासाठी शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र प्रयत्न करावा. केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाकडे सुसज्ज अंमलबजावणी कक्ष उपलब्ध आहे. बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फौंडेशन व क्लिंटन हेल्थ एक्सेस इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे.
क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निगडित सर्व डेटा तयार करण्यात येऊन कार्यक्रमात येणाऱ्या अडी-अडचणी, नियोजन आणि चांगला विचार करुन कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनासाठी याची मोठी मदत होणार आहे. यात खाजगी, शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांचा आढावा घेऊन त्या नुसार पुढील नियोजन केलं जाणार आहे. या नियोजनाद्वारे जिल्हा आणि तालुक्यांशी थेट संवाद होऊन दैनंदिन कामकाजाला वेग येणार आहे. त्यातून गुणवत्ता आणि सुधार करण्यासाठीच्या कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करण्यात आला.
क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम हा जिल्हा, तालुका व गाव पातळीवर अधिक सक्षम होणार असून नियोजन अंमलबजावणी, शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आणि संनियंत्रण पाठपुरावा यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.