Pune H3N2 Virus : पुण्यात मागील काही दिवसांपासून H3N2 आणि कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यात आज पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 या विषाणूने पहिला मृत्यू झाला आहे. 73 वर्षीय रुग्णाला 8 मार्चला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा त्यांना H3N2ची लक्षणे आढळली होती. म्हणून त्याच दिवशी त्यांचे नमुने पाठविण्यात आले. 10 मार्चला त्यांना H3N2 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. हृदयाशी निगडित त्यांना अधिकचा (Pimpri chinchwad) त्रास होत असल्यानं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
शहरातील H3N2 विषाणूचा पहिलाच रुग्ण आढळला होता. त्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झालाय शहरात सध्या चार रुग्ण H3N2 बाधित आहेत. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेली आहे. पुण्यात सध्या H3N2 आणि कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. त्यात बदलत्या वातावरणामुळे पुणेकरांना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
लवकरात लवकर उपचार करा...
शहरात सध्या व्हायरलची म्हणजेच H3N2 या व्हायरसची साथ असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे. आतापर्यंत पुण्यात H3N2 या विषाणूचे 22 रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते मार्च या दरम्यान पुणेकरांना बाधा झाली आहे.
मास्क वापरा...
कोरोनापासून सुटका झाली असली तरीही आता H3N2 या नवीन व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे हा व्हायरस झापाट्याने पसरत असून लोकांमध्ये दहशत दिसून येत आहे. तर H3N2 या व्हायरसमुळे देशात दोघांचा बळी गेलाय. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून, सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर केल्या आहेत. ज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.