Pune Fire : पुण्यातील (Pune) सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या घडली. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.
रात्री 12 वाजल्यापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते
अग्निशामक दलाकडून रात्री 12 वाजल्यापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर त्यांना यश आलं आहे. पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्यानं आग आटोक्यात येत नव्हती. आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली होती. दुसऱ्या बाजूने वाहने जात आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील MNGL गॅस पाईपलाईनला रात्री 12 वाजता आग लागली होती. ही आग आजुबाजुला तीन ठिकाणी पसरली होती. त्यामुळं अधिक पाण्याचे बंबं बोलवावे लागले होते. आग पसरल्यामुळं नियंत्रण मिळवण्यास वेळ लागला.
अचानक गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ घडली. त्यानंतर मोठी आग लागली. यामुळं एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनेचीमाहिती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग
गॅसची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेबरोबरच पुण्यातील नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या भागात अनेक लहान लहान औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या जवळ असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला आग लागली आहे.