पुणे : पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. तिसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच पुण्यात कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. पुणे शहर आणि ग्रामीण दोन्हीमध्ये आज, कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. दिवसभरात पुणे जिल्ह्यात 105 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 240 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रूग्णांची संख्या  14 लाख 50 हजार 903 इतकी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 2177 इतकी झाली आहे. पुण्यातील मृताची संख्या 19 हजार 674 इतकी झाली आहे. आतापर्यंत 14 लाख 29 हजार 059 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. तिसऱ्या लाटेनंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळाला आहे.


राज्यात नवे 407 कोरोनाबाधित


 राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये होणारी घट आजही कायम आहे. आज रुग्णसंख्या थेट 500 खाली पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात 407 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात फक्त चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 407 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. दिवसभरात एक हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण 77, 11, 343 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04 % इतके झाले आहे. राज्यात सद्यस्थितीला 6, 663 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आज झालेल्या चार कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % इतका झाला आहे. सध्या राज्यात 1,32,886 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha