Mumbai Corona Update : मुंबईतील (Mumbai) मागील काही दिवासांपासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. आजतर रुग्णसंख्या थेट 100 च्या आत पोहोचल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत नव्या 73 कोरोनाबाधितांचीच नोंद झाली आहे. दरम्यान कमी झालेल्या या रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनालाही (BMC) दिलासा मिळाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 73 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 95 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 815 इतकी झाली आहे. मुंबईच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 73 रुग्णांपैकी 7 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 927 बेड्सपैकी केवळ 699 बेड वापरात आहेत.
रुग्ण दुपटीचा दर 5000 पार
कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर थेट 5 हजारांच्या पार पोहोचला आहे. काल हा दर 4 हजार 895 होता. ज्यानंतर त्यात आता 170 दिवसांची वाढ होऊ आज हा दर 5065 वर पोहोचला आहे.
देशात 8 हजारच्या घरात नवे कोरनाबाधित
भारतातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक आता जवळपास संपला आहे. दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच देशात 10 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 8,013 नवीन रुग्ण आढळले असून 119 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 16,765 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, म्हणजेच 8871 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी 9,195 कोरोना रुग्णांची नोंद झाली होते.
हे ही वाचा :
- Coronavirus Cases Today : कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच 10 हजारांहून कमी रुग्ण, 119 जणांचा मृत्यू
- New Unlock Guidelines : आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी, वाचा नव्या मार्गदर्शक सूचना
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha