पुणे : पुण्यात आता वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाही. वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असल्याच अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटल आहे.
पोहे, बटाटावडा यासारखे गरम खाद्यपदार्थ सर्रास वर्तमानपत्रामध्ये बांधून दिले जातात. तसेच अनेक खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर तेलातून पदार्थ काढल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर पसरले जातात. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो. मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. वर्तमानपत्राच्या कागदामधील शाई पचनक्रियेत बिघाड करण्यास कारणीभूत ठरतात, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे या पुढे पोहे, बटाटवडा यासारखे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याच आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
वर्तमानपत्र किवा मासिकाचा कागद अधिक आकर्षित बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. त्यामध्ये डायआयब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अन्नपदार्थाचे पॅकिंग त्वरित बंद करण्याचे आदेश छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते यांना देण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या
Weight Loss Juice Recipe : झटपट वजन कमी करायचंय? काकडी-कोथिंबीरीचा ज्यूस ठरतो फायदेशीर
Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत
Merry Christmas 2021 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण