Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळं त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच शरद पवार यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर जागेवरच डॉक्टरांकडून शरद पवारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.


शरद पवार यांचे वय 83 झाले तरी ते सातत्यानं दौरे करत असतात. सध्या ते दिवाळी सणामुळं बारामती येथील निवासस्थानी आहेत दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सर्व पवार कुटुंब एकत्र दिवाळी सण साजरा करतात. त्यासठई शरद पवार हे देखील बारामतीत दाखल झाले आहेत. पण आज अचानक विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच शरद पवार यांना त्रास जाणवू लागला, त्यामुळं डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी पवारांना विश्रांतीचा सल्ला दिली आहे. 


बैठकीला अजित पवार अनुपस्थित


विद्या प्रतिष्ठान संस्थेची वार्षिक सर्वसाधारण बैठक बारामतीतील व्हीआयटीमध्ये पार पडली. या बैठकीला विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. मात्र अजित पवार या बैठकीस आले नाहीत. या बैठकीला उपाध्यक्ष अशोक प्रभुणे,खासदार सुप्रिया सुळे, प्रताप पवार, योगेंद्र पवार, सुनेत्रा पवार यांच्या सह अन्य विश्वस्त उपस्थित आहेत. मात्र अजित पवार या बैठकीला उपस्थित नाहीयेत. सध्या ही बैठक विद्या प्रतिष्ठानच्या व्हीआयटी मध्ये झाली. दरम्यान, उद्या पुरंदर तालुक्यातील निरा आणि सासवड येथे होणारा शरद पवारांचा शेतकरी भेटीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, काही दिवस संकटांचे विस्मरण करुन कुटुंबासमवेत घालवावे लागतात!