इंदापूर, पुणे : इंदापूरात शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसला आहे. सोनाईचे कट्टर समर्थक प्रवीण माने (Pravin Mane Sonai) आणि माने कुटुंबियांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे विकसासाठी भाजप बरोबर गेले आहेत.आम्ही बारामतीचा विकास व्हावा यासाठी अजित दादा यांच्या बरोबर जात आहे, असं माने कुटुंबियांनी म्हटलं आहे. 


बारामती लोकसभा मतदार संघ निवडणूक सुरू आहे. माने कुटुंब पवार कुटुंब सोबत राहिला आहे.अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी माने कुटुंब त्यांच्या बरोबर राहणार आहोत.अजित पवार हे विकसासाठी भाजप बरोबर गेले आहेत.आम्ही विकास व्हावा यासाठी अजित दादा यांच्या बरोबर जात आहे. अजित दादांनी काम केले आहेत. आम्ही ठाम पणे अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचं निर्णय घेतला आहे.आज पासून प्रचार सुरू करत आहोत,असं प्रवीण माने म्हणाले आहेत. 


महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या बाजूला गेल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने कमी परंतु प्रवीण माने हे शरद पवारांच्या बाजूला असल्याने पुढील विधानसभेचा चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्याकडेदेखील पाहिले जायचं परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा पार पडणार होता. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले. त्यावेळी स्वागताला प्रवीण माने त्यांना अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकांना राजकारणा पेक्षा विकासला महत्व द्यावं वाटतं, त्यामुळे प्रवीण माने आणि कुटुंबियांनी अजित दादा बरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे, असं प्रदीप गारटकर म्हणाले. 


 शरद पवारांना मोठा धक्का 


प्रवीण माने आणि माने कुटुंब हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचा पुढील विधानसभेचा चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्याकडेदेखील पाहिले जायचं. त्यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची आखणीदेखील केली आणि प्रचारासाठी मैदानात देखील उतरले होते. मात्र आता ते सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar : मोदींशिवाय कोणताही पर्याय विरोधीपक्षात दिसत नाही; अजित पवार