पुणे : राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. त्यात पुणे,शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातीलदेखील मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानाला थंड प्रतिसाद दिसत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.90 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी 5  वाजेपर्यंत 43.89 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 46.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  सकाळच्या सुमारास पुणेकरांनी मतदानासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी पुणेकरांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर दुपारीदेखी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. 


1 वाजेपर्यंत कसबा विधानसभा मतदार संघात सगळ्यात जास्त मतदानाची नोंद झाली होती. तर वडगावशेरी आणि शिवाजी नगर या दोन विधानसभा मतदारसंघात सगळ्यात कमी मतदानाची नोंद झाली होती. आता 3 वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली तर पर्वती विधानसभा मतदार संघात जास्त मतदानाची नोंद झाली आहे. कसबा पेठ - 51.07%, कोथरूड - 48.91%, पर्वती - 46.80%, पुणे कॅन्टोन्मेंट - 44.01%, शिवाजीनगर - 38.73%, वडगाव शेरी - 40.50% मतदानाची नोंद झाली आहे. 


 3 वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात 33.7 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यात कोथरुड विधानसभा मतदार संघात 37.2, वडगावशेरी विधानसभा मतदार संघात 26.61 टक्के, कोथरुड विधानसभा मतदार संघात 37.2 टक्के, पर्वती विधानसभा मतदार संघात 27.14 टक्के तर कसबा विधानसभा मतदार संघात 35.23 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यासोबतच मावळ 36.54 टक्के मतदानाची नोंद झाली होती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात  36.43 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 


राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35  टक्के मतदान झाले आहे.चौथ्या टप्प्यातील एकूण 11लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे...


नंदुरबार -  49.91टक्के
जळगाव -   42.15 टक्के
रावेर -  45.26 टक्के 
जालना -47.51 टक्के
औरंगाबाद  - 43.76  टक्के
मावळ - 36.54 टक्के
पुणे - 35.51 टक्के
शिरूर -   36.43 टक्के
अहमदनगर-  41.35  टक्के
शिर्डी - 44.87 टक्के
बीड - 46.49 टक्के


इतर महत्वाची बातमी-


बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर


Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार