पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल, त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, जेणेकरून लोकांना आवश्यक त्या वस्तू घेण्यासाठी, त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वेळ मिळेल. त्यामुळे कुठलाही कठोर निर्णय घेण्याआधी नागरिकांचा विचार करण्यात येईल असा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कोरोना वाढल्यामुळे राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री बोलत होते.


कोरोना झाल्यानंतर सुरुवातीला नागरिक घाबरत होते, एकमेकांना भेटण्याचे देखील टाळत होते. परंतु, आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते असल्याचे अजित पवार म्हणाले. मागच्यावेळी बाधित झालेला एक व्यक्ती पाच जणांना बाधीत करत होता तर यावेळेस ही संख्या वाढली असून बाधित व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला (15 ते 20 जणांना) बाधा होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचेही त्यांनी सांगितले.


Maharashtra Corona Guidelines: महाराष्ट्रात संपूर्ण नाही मात्र विकेंड लॉकडाऊन, उद्यापासून कडक निर्बंध! काय सुरु, काय बंद?


काय म्हणाले अजित पवार?



  • पुण्यात ज्या पद्धतीने निरबंध लागू केलेत तसेच निर्बंध सर्वत्र लागू करण्याची अनेकांची मागणी, त्याबाबत उद्या 8 वाजता निर्णय होईल.

  • देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे आणि यामध्ये राजकारण आणू नये अशी विनंती मुख्यमंत्री यांनी केली आहे.

  • लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही.

  • पुणे जिल्ह्यात ऑक्सजिनची कमतरता नाही.

  • पंढरपूरमध्ये केंद्र सरकारने निवडणूक लावलेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपवाद आहे, केरळ, बंगालमध्येही निवडणुका आहेत तर तिथे निर्बंध का नाहीत असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत, पण नियम पाळून प्रचार करावा.

  • बापट यांच्यासमोर बैठकीत निर्णय झाले होते, आतली चर्चा बाहेर करायची नसते पण सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला.

  • लॉकडाऊन कोणालाही नको आहे, पण लोक ऐकत नसतील तर पर्याय नाही, वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा लागेल.