पुणे : सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. याचसोबत बहुतांश मोठ्या राज्यांचे बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.


बारावीच्या सर्वच शाखांची परिक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारवीची परिक्षा जरी संपली असली तरीही लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे मागच्या वर्षी 28 मेला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पण यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल लागण्याला उशीर झाला आहे.


यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परिक्षेचा निकाल कधी लागतो याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे.


पाहा व्हिडीओ : SSC HSC Results | दहावीचा निकाल 15-20 जुलै दरम्यान तर, बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार



काही दिवसांच्या आधीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै दरम्यान लागेल अशी माहीती दिली होती. तर दहावीचा निकालही 31 जुलैपर्यंत लागेल असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे 15 जुलैला बारावीचा निकाल लागेल का याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत.


बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध तारखा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. निकाल ज्या दिवशी असतो त्याच्या एक दिवस आधीच बोर्डाकडून निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात येते. तसंच हा निकाल विद्यार्थी कुठे बघू शकतात याचीही माहीती बोर्डाकडून जाहीर करण्यात येते. यामुळे यावर्षीही बारावीच्या निकालाची तारिख दरवर्षीप्रमाणे अधिकृतपणे कळविण्यात येईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड


CBSE 12th Result 2020 | सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गुणवत्ता यादी नाही