पुणे: मुंबई- पुणे मार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळं मुंबई-पुणे  रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्याची घोषणा केली जात आहे.

मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास बोगी रुळावरुन खाली घसरली. ही बोगी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

पुण्याच्या दिशेला ही रेल्वे येत असताना खंडाळ्याजवळ अचानक मागच्या इंजिनचं प्रेशर वाढले आणि ही एक बोगी लोहमार्गावरून खाली उतरली. ती बोगी हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु असून, घसरलेली बोगी सोडून रेल्वे पावणे सहा वाजता पुढे मार्गस्थ झाली आहे.

यामुळे डाऊन लाईनवरील वाहतूक बंद असून, मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे या मिडल लाईन वरुन पुण्याला येत आहेत तर मुंबईला जाणाऱ्या अप लाईन वरुन धावत आहेत. या अपघातामुळे रेल्वे पंधरा मिनिटं उशिरा धावत आहेत.