PCMC Water Issue: पिंपरी चिंचवडमध्येही काही दिवसात पाणीकपात होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर पाणी कपातीच संकट ओढवणार आहे. पाठ बंधारे विभागाने पाणी कपात करण्याच्या सूचना महपालिकेला दिलेल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात धरणात केवळ साडे सोळा टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 35 टक्के पाणी साठा निर्माण झाला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत तर शहरातील नागरिकांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कधी ही पडू शकते.
 
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत साडे 500 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा अवघ्या दोनशे तीस मीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळेच जुलैमध्ये पिंपरी चिंचवड शहरावर पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. पाटबंधारे विभागाने अशा प्रकारची चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे याच पवना धरणातून ज्या पवना नदी मध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो ती देखील अतिशय संथ गतीने वाहते आहे. पवना नदीच्या दुतर्फा अनेक गावं वसलेली आहेत त्या गावाची शेती या पवना नदी वरती अवलंबून असते ते शेतकरी देखील आता चिंतेत आहेत. त्यांनी पेरणी केली परंतु ज्या अपेक्षेने त्यांना पावसाची ओढ होती तो पाऊस मात्र अद्याप झाला नाहीये. पाटबंधारे विभागानं पाणी कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला दिलेल्या आहेत. मात्र ऐन पावसाळ्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्याने शहरवासीय चिंतेत आहे.


पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा
धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) अखेर पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खडकवासला धरण प्रकल्पात केवळ दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवले होते. पावसाला विलंब झाल्यास परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. पुण्यात पूर्वीपासूनच असमान पाणीपुरवठा आहे. सध्या काही भागात दिवसभर पाणी असते, तर बहुतांश भागात दिवसातून एकदाच पाणी येते. त्यामुळे तेथे पाणीकपात लागू केल्यास नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळणार नाही. त्यामुळे पाणी कपातीनंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी पर्यायी दिवशी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.