पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या 48 तासाच्या पावसाने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर पर्यटकांना पायऱ्यांवर सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सहकार्य करण्याचं आवाहनही पोलिसांनी पर्यटकांना केलं आहे.

वीकेंडला वाहतूक मार्गात बदल

वीकेण्डला लोणावळ्याचा पिकनिक प्लॅन करणार असाल, तर तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. कारण शनिवार आणि रविवारी भुशी धरणाकडे तुम्हाला जायचं असेल तर दुपारी तीनपूर्वी जावं लागणार आहे.  तर पाच वाजता भुशी धरणावरून खाली उतरावे लागणार आहे.

पर्यटकांची वाहतूककोंडी आणि सुरक्षेच्या कारणास्तव लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीननंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे.

कशी असेल वाहतूक व्यवस्था?