मावळ,पुणे : मावळ लोकसभेचे महायुतीचे   (Maval Lok Sabha election 2024) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी  मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेकांना आपल्या लोकप्रतिनिधीचं शिक्षण किती आणि आपल्या लोकप्रतिनिधींकडे किती संपत्ती आहे लोकप्रतिनिधी किती श्रीमंत आहे. याची अनेकांना उत्सुकता लागली असते. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मावळ लोकसभेचे महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे 2022मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. खासदार असतानाच त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि चक्क ते पास ही झाले आहेत.


शिवसेनेचे मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी 2014 आणि 2019 मधील निवडणुक लढवली आणि सलग दोनवेळा ते खासदार झालेत. यंदा हेट्रिक साधण्यासाठी बारणेंनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात 2022 मध्ये दहावीची परीक्षा दिल्याचं आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख केलाय. चिंचवडच्या फत्तेचंद जैन विद्यालयात बारणेंमध्ये त्यांनी परीक्षा दिली होती.


● जंगम मालमत्ता : 15 कोटी 82  लाख 10 हजार


● स्थावर मालमत्ता : 90 कोटी 73 लाख 39 हजार


● एकूण : 106 कोटी 55 लाख 50 हजार रुपये


पत्नी सरिता बारणे यांची संपत्ती


- जंगम मालमत्ता : 1 कोटी 18 लाख 66 हजार


-स्थावर मालमत्ता : 24 कोटी 36 लाख 74 हजार रुपये


-एकूण : 25 कोटी 68 लाख 41 हजार रुपये


-बारणे कुटुंबीयांची एकूण संपत्ती : 132 कोटी 23 लाख 91 हजार ६३१ रुपये


-पाच वर्षांत वाढलेली संपत्ती : 29 कोटी 42 लाख 81 हजार 497 रुपये


बारणे यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ आणि टोयाटो फॉर्च्युनर या दोन मोटारी आहेत. त्यांच्याकडे हिऱ्याची 11 लाख 55तर पत्नी सरिता यांच्याकडे पाच लाख 50 हजारांच्या कर्णकुड्या, 51 लाखांचे 743 ग्रॅम सोने आहे. बारणे यांच्यावर 44 लाखांचे वाहन हजारांची एक अंगठी, तर 32 लाख 50 हजारांचे 470 ग्रॅम सोने आहे. 35 हजारांचे एक वेब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हरही आहे. 


मताधिक्याचा नवा विक्रम करणार - बारणे


उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार बारणे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या निवडणुकीत आपण 2019 मधील आपलाच मताधिक्याचा विक्रम मोडून निवडून येऊ, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आपण विजयी होऊ, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.


इतर महत्वाची बातमी-


 घरंदाज बाणा, पारंपारिक दागिने, उदयनराजेंच्या शाही तिजोरीत असलेल्या नथीची किंमत किती?