मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून 26 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. नाईट लाईफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी बोलताना मुंबईप्रमाणे पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याचा काही प्रस्ताव आहे का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, 'पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरू करतोय'


पाहा व्हिडीओ : पुण्यात नाईट लाईफ नाहीतर आफ्टरनून लाईफ सुरू करणार; आदित्य ठाकरेंचं मजेशीर उत्तर



पुणे म्हटलं की, पुणेरी पाट्या आणि अपमान ठरलेलं समीकरण. पण त्यानंतर जर पुण्याबाबत सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे, पुण्यातील लोकांची वामकुशी घेण्याची सवय. पुण्यातील अनेक दुकानंही दुपारच्या वेळेत बंद ठेवण्यात येतात. सध्या परिस्थिती बदलत असली तरीही पुणेकरांवर लागलेला हा शिक्का काही गेलेला नाही. 'पुणे दुपारी 1 ते 4 बंद' या गोष्टीवरून अनेकदा पुणेकरांना ट्रोलही करण्यात येतं. याचाच आधार घेऊन आदित्य ठाकरेंनी पुण्यात नाईट लाईफ ऐवजी आफ्टरनून लाईफ सुरू करत असल्याचे म्हटलं आहे.


दरम्यान, मुंबईतील नाईट लाईफला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून 26 जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. नाईट लाईफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. नरिमन पॉईंट, काला घोडा, बीकेसी, कमला मिल अशा मुंबईतील अनिवासी भागात नाईट लाईफ सुरु होणार आहे.


संबंधित बातम्या : 


Mumbai Nightlife | नाईट लाईफला मंत्रीमंडळाची मंजुरी : आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय, मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर 'नाईट लाईफ' सुरु


आदित्य ठाकरेंचा 'नाईट लाईफ'चा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, गृहमंत्र्यांचे संकेत