पुणे : यंदाच्या दिवाळीत पुण्यात सोनं खरेदी ओघ ओसरलेला पाहायला मिळाला. धनत्रयोदशीच्या दिवशी होणाऱ्या सोन्याच्या खरेदीत यंदा विक्रमी घट झाली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी यंदा प्रथमच पुण्यात बाजारात यादिवशी शुकशुकाट जाणवला.
पुण्यात यंदा सोनं खरेदीत जवळपास 30 टक्क्यांची घट झाल्याचं सराफी व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.
वास्तविक, सोनं खरेदीसाठी उशीरापर्यंत लांबलेला पाऊस, त्याचा पीकांना बसलेला फटका, नोटाबंदी आणि सोने- चांदीच्या किंमतीत झालेली वाढ आदी कारणं दिली जात होती. पण त्यातच जीएसटीचा भार पडल्यानं थोड्याफार ग्राहकांनाही सोनं-चांदीच्या बाजारपेठेपासून दूर ठेवलं.
सोन्याच्या कारिगरीवर 18 टक्के आणि निव्वळ सोन्यावर 3 टक्के जीएसटी लादण्यात आल्यानं सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली होती. त्यामुळे पुण्यातल्या सोनं व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला.
दरम्यान, जीएसटी आणि नोटाबंदीमुळे सराफी व्यवसायावर मोठा परिणाम केल्याचं मत प्रसिद्ध सुवर्णकार फतेहचंद रांका यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यात धनत्रयोदशी दिवशी सोनं खरेदीत घट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Oct 2017 11:28 PM (IST)
यंदाच्या दिवाळीत पुण्यात सोनं खरेदी ओघ ओसरलेला पाहायला मिळाला. धनत्रयोदशीच्या दिवशी होणाऱ्या सोन्याच्या खरेदीत यंदा विक्रमी घट झाली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी यंदा प्रथमच पुण्यात बाजारात यादिवशी शुकशुकाट जाणवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -