पुण्यामध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याची 3 पिल्लं आढळली
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 13 Nov 2016 01:46 PM (IST)
पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शिवारात ऊसतोडणी दरम्यान बिबट्याची पिल्लं आढळली आहेत. शिरुर तालुक्यातल्या वडगाव-रासाई गावात ही पिल्लं आढळली. या पिल्लांमध्ये दोन मादी आणि एक नर आहे. ही पिल्लं दृष्टीस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. वडगावच्या रासाई येथील जयराम आण्णा खळदकर यांच्या शेतात ऊसतोडणी करत असताना बिबट्याची पिल्ले सापडली असून वनअधिकाऱ्यांनी यातील दोन मादी आणि एक नर असल्याचे सांगितले.